Murlidhar Mohol | मोहोळांसाठी भाजपची नवी रणनीती, “घर चलो अभियान” राबवत १२ लाख नागरिकांपर्यंत पोहोचणार

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ , महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे. तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने दिवसेंदिवस प्रचाराला वेग आला असून प्रचाराच्या नवनव्या रणनीती आखल्या जात आहेत. आता महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भाजपनेही पक्ष पातळीवर कंबर कसली असून पक्षाच्या वतीने भाजपच्या वर्धापन दिनी (६ एप्रिल) “घर चलो अभियान” राबवण्यात येणार आहे.

येत्या ६ एप्रिल रोजी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपकडून “घर चलो अभियान” राबवण्यात येणार आहे. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी भाजप पुणे शहरात ३ लाख घरांमध्ये एक विशेष पत्रक वाटले जाणार आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील देखील अभियानात सहभागी होणार आहेत. पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदार देखील घरोघरी जात पत्रक वाटणार आहे.

दरम्यान, या माध्यमातून भाजपचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत. या माध्यामातून प्रत्येक पुणेकरांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. साधारण पुण्यात १० ते १२ लाख नागरीकांना हे पत्रक वाटप करण्यात येणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत