शरद सोनवणेंच्या ‘त्या’ फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकर ही म्हणतात नेमकं काय घडणार?

Sharad Sonwane : महाराष्ट्राचे राजकारण हे सद्या दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीत कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. आता पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये (Junnar) रात्रीत झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

नागरिकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने केवळ काही वाक्य लिहून उभारले जाणारे फ्लेक्स कायम चर्चेचा विषय बनतात. यामध्येच एखाद्या नेत्याने अशा पद्धतीने बॅनर्स उभारल्यास काहीतरी राजकीय घडामोड घडणार, हे मात्र नक्की. जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे (Former Junnar MLA and Shiv Sena district president Sharad Sonwane) यांच्याकडून लावण्यात आलेले फ्लेक्स सद्या मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत.  29 सप्टेंबर 2023 सर्वात मोठी घोषणा होणार असा मजकूर लिहिण्यात आलेल्या फ्लेक्समुळे जुन्नरच्या राजकारणात चर्चेला उधाण आल आहे.

एका बाजूला राज्यातील राजकारण अस्थिर बनले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आणि या गटामध्ये जाण्यावरून विद्यमान आमदार अतुल बेनके यांची असलेली संभ्रमावस्था, यावरून सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे. आता शरद सोनवणे हे नवीन काय घोषणा करणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे

महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी बुमराह परतला, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारत देणार तगडे आव्हान

राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची घणाघाती टीका! आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन