एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही एकत्र खूश का राहू शकत नाहीत जोडपी? श्री श्री रविशंकर यांच्याकडून जाणून घ्या कारण आणि उपाय

जेव्हा दोन व्यक्ती नात्यात येतात तेव्हा त्यांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अनेकवेळा ही गोष्टही मनात निर्माण होते की आता समोरच्या व्यक्तीच्या भावना बदलल्या आहेत. त्याला आता तुमच्या सुख-दुःखाची पर्वा नाही. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो. दुसरीकडे हे नातं लाईफ पार्टनर किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचं असेल, तर मनातल्या या एका शंकेमुळे वर्षानुवर्षे नातं नकारात्मकता, मतभेद आणि भांडणानं भरून जातं. म्हणूनच प्रेमाची योग्य समज असणे खूप महत्वाचे आहे. आपण सर्वजण प्रेमाने वेढलेले आहोत, काही लोकांना ते अनुभवण्याची संधी देखील मिळते. पण तरीही बहुतेक लोकांचा त्याकडे चुकीचा दृष्टिकोन आहे.

अध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांना नुकतेच त्यांच्या एका प्रवचनात विचारण्यात आले की, कोणत्याही नातेसंबंधात संघर्ष टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे. यावर उत्तर देताना गुरुजींनी जे सांगितले ते तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल विचार करायला (Shri Shri Ravishankar Relationship Advice) लावू शकते.

प्रेमाचा पुरावा मागणे चुकीचे आहे
‘तुझे माझ्यावर खरोखर प्रेम आहे?’ जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला असे कधी म्हटले असेल तर तुमचे नाते धोक्यात आले आहे. श्री श्री रविशंकर गुरुजी सांगतात, एखाद्याला त्याच्या प्रेमाचा पुरावा कधीच विचारू नका. कारण असे करणे खरोखर खूप कठीण आहे. प्रेम ही खूप खोल भावना आहे, जी कोणत्याही पुराव्याद्वारे सिद्ध केली जाऊ शकत नाही.

तुमच्यातील प्रेम अनुभवा
प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या, ती व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असू शकते. म्हणूनच एखाद्या व्यक्तीला तुम्हाला हवे असलेले प्रेम दाखवता येत नाही या आधारावर त्याचा न्याय करणे चुकीचे आहे. यावरून त्याचे प्रेम खोटे असल्याचे सिद्ध होत नाही. अध्यात्मिक गुरूजी श्री श्री रविशंकर म्हणतात की तुमचा जोडीदार किंवा जवळचा कोणीतरी तुम्‍हाला हवं तसं प्रेम व्‍यक्‍त करत नसला तरीही आनंदी राहा. स्वतःमध्ये प्रेम अनुभवा आणि समजून घ्या की प्रेम प्रत्येकाच्या मनात असते जरी ते त्यांच्या भावना व्यक्त करत नसले तरीही.

तुमचे प्रेम करणे पुरेसे आहे
आजच्या काळात प्रेम देणे आणि घेणे हा व्यवसाय बनला आहे. जर आपण एखाद्यावर प्रेम केले तर त्या व्यक्तीने आपल्यावर तितकेच किंवा त्याहून अधिक प्रेम करावे अशी आपली अपेक्षा असते. आणि जेव्हा हे घडत नाही तेव्हा नात्यात अनबन सुरू होते. एकमेकांवर खूप प्रेम करणारी दोन माणसे देखील एकत्र आनंदी राहू शकत नाहीत.

म्हणूनच श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणतात की, प्रेम न करणे किंवा व्यक्त न होणे ही तुमची समस्या नसून तुमच्या जोडीदाराची समस्या आहे असा विचार करून तुम्ही नेहमी प्रेम केले पाहिजे. असे केल्याने तुम्ही तुमचे प्रत्येक नाते तुटण्यापासून वाचवू शकता.