Supriya Sule | बारामतीत सर्व पुरुष माझ्याविरोधात एक झालेत

Supriya Sule | अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक (Baramati Loksabha 2024 Election) ही लक्ष्यवेधी ठरणार हे निश्चित आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर इंडिया आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात आहेत. विकासकामांच्या मुद्द्यावरवर हि निवडणूक लढवली जाईल अशी शक्यता होती मात्र गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे या भावनिक राजकारण करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे षडयंत्र भाजप करत असल्याचा आरोप त्या सातत्याने करत आहेत. बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचे नेते एकवटले आहेत. आम्ही मात्र सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू असं सांगत सुप्रिया सुळे यांच्याकडून भावनिक आवाहन केले जात आहे. यादरम्यान सगळे पुरुष माझ्याविरोधात एक झाले आहेत, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

बारामतीत केवढी आदळआपट सुरू आहे. याला धर, त्याला धर सुरू आहे. सगळे माझ्याविरोधात झालेत. बारामतीत सर्व पुरुष माझ्याविरोधात एक झालेत, ईस्ट इंडिया कंपनीसारखं काम सुरु आहे. पण मीएकटी त्यांच्याविरोधात लढतेय कारण मी स्वाभिमानी मुलगी आहे, असा घणाघात सुप्रिया सुळेंनी केलाय. नवी मुंबईत मविआच्या मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !