माहुलमधील प्रदुषणकारी दोन कंपन्यांवर कारवाई करा – आशिष शेलार

मुंबई – माहुलमधील प्रदूषण करणाऱ्या दोन कंपन्यांना स्थलांतरित करण्यात याव्यात अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत आज केली. माहुल आणि आजूबाजूच्या परिसरातील रासायनिक उत्सर्जन व वायू प्रदूषणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. स्थानिक रहिवाशांना प्रदूषणामुळे श्वसनविकार व अन्य आजार जडल्याची खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेत वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत.

हरित लवादाने एजीस लॉजिस्टिक्स लिमिटेड व सीलॉर्ड कंटेनर्स लिमिटेड या कंपन्यांनांवर ठपका ठेवला. त्यांना 10 हजार कोटीचा दंड ठोठावला होता. मात्र
तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी याबाबत कार्यवाही केली नाही. म्हणून विद्यमान मुख्यमंत्र्यांनी याबाबत कारवाई करुन या कंपन्या स्थलांतरित करा अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.