पुन्हा वादात सापडला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, निर्मात्यांनी शैलेश लोढांना दिले नाहीत हक्काचे पैसे!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) ही हिंदी टीव्ही सिरियल आज भारतभरात लोकप्रिय आहे. अगदी तुम्ही-आम्ही तारक मेहता… सिरिययल पाहात मोठे झालोय. वर्षानुवर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे हे सिरियल गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. दया भाभींनी हे सिरियल सोडल्यापासून बरीचशी पात्रे बदलली आहेत. अंजली भाभीचे पात्र साकारणारी नेहा असो वा लोकप्रिय तारक मेहता (Tarak Mehta) असो. या कलाकारांनी अचानक सिरियलमधून एक्झिट घेतल्याने हे सिरियल विवादाच्या भोवऱ्यात सापडू लागले आहे.

त्यातही आपल्या वाकबगार काव्य शैलीने आणि जेठालालला प्रत्येक संकटातून सोडवणाऱ्या तारक मेहता अर्थातच शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी सिरियल सोडल्यानंतर तर खूप चर्चा झाली. शैलेश लोढा यांच्या तारक मेहता शोमधून बाहेर पडण्यावरून सर्व प्रकारचे अटकळ बांधले जात होते. कधी त्यांचे निर्मात्यांशी भांडण झाल्याचे बोलले जात होते, तर कधी शैलेश लोढा यांनी आपल्या नवीन शोमुळे ‘तारक मेहता’ला अलविदा केल्याचे बोलले जात होते.

पण आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. असे वृत्त आहे की, शो सोडल्यानंतर सहा महिने उलटले तरीही निर्मात्यांनी अद्याप शैलेश लोढा यांची थकबाकी (Shailesh Lodha Salary) भरलेली नाही. शैलेश लोढा यांना त्यांचे ४० काळ मिळणे बाकी आहेत असे समजत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता’ सिरियल सोडली कारण त्यांचे निर्मात्यांशी भांडण झाले होते. शैलेश लोढा यांना शोमध्ये अपमानित झाल्यासारखे वाटत होते, त्यामुळे त्यांनी कोणतीही सूचना न देता शो सोडला. महत्त्वाचे म्हणजे तारक मेहताच्या निर्मात्यांनी एखाद्याचे पैसे देण्यास एवढा विलंब करण्याची ही पहिलीच वेळ नाही. रिपोर्ट्सनुसार, शो सोडल्यानंतर मेकर्सनी नेहाला पैसेही दिले नाहीत.

शैलेश लोढा त्यांचे पैसे मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु निर्माता असित मोदी त्याकडे लक्ष देत नाहीयेत. शैलेश लोढा यांनी एप्रिल २०२२ मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ला निरोप दिला होता.