अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यसाठी ठाकरे गटाचे प्रयत्न; फडणवीसांना लिहिले पत्र

मुंबई : अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक लागणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे. मात्र, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी सेनेकडून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहीले आहे.

शिवसेनेचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहीले आहे. या पत्राद्वारे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती जानावळे यांनी केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या पत्रात ?

स्वर्गवासी पतीच्या जागेवर लढणान्या महिलेचा आदर म्हणून आपण अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करून नवदुर्गेच्या महाराष्ट्राची स्त्री सन्मानाची परंपरा कायम ठेवाल आणि अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करून श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांना सन्मानाने विधानसभेत पाठवाल हीच भारतीय जनता पक्षाची स्व. रमेश लटके साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल असे या पत्रात म्हटले आहे.