Thalapathy Vijay | एक हजार कोटी बजेटच्या सिनेमातून एकट्या थलपथी विजयने घेतली 250 कोटी रुपये फिस!

Thalapathy Vijay | 2024 ची सुरुवात ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी खूपच चांगली होती. छोट्या बजेटच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खूप धमाल केली. आता त्या सिनेमांची पाळी आहे ज्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर, थलपथी विजय (Thalapathy Vijay) यांच्या चित्रपटाचाही या यादीत समावेश आहे. थलपती विजय सध्या ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (GOAT) वर काम करत आहे. यानंतर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा समोर येईल, ज्याचे बजेट सुमारे 1000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. हा राजकीय ड्रामा आहे.

विजय त्याच्या शेवटच्या चित्रपटासाठी इतके पैसे घेतोय!
थलपथी विजयने काही काळापूर्वीच आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्याचे नाव आहे- तमिझा वेत्री कळघम (TVK) आहे. थलपथी विजय सध्या ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (GOAT) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा 68 वा चित्रपट आहे. व्यंकट प्रभू या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग रशियात सुरू आहे. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच विजयचा पुढचा आणि शेवटचा चित्रपट चर्चेत येऊ लागला आहे.

थलपथी विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे बजेटही जवळपास 1000 कोटी रुपये आहे. दरम्यान, तेलुगु डॉट कॉमचा एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यानुसार थलपथी विजयने या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटासाठी 250 कोटी रुपये फी मागितली आहे. एजीएस एंटरटेनमेंट या चित्रपटाची सहनिर्मिती करू शकते, असेही बोलले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती