Shoaib Malik | अरे देवा? तिसऱ्या लग्नानंतरही ‘या’ अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करतोय पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक

Shoaib Malik | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शोएब मलिक काही दिवसांपूर्वी त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत होता. शोएब आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटानंतर या क्रिकेटरने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले होते. यानंतर शोएबला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. आता शोएब मलिकचे नाव आणखी एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत जोडले जाऊ लागले आहे. ज्यानंतर शोएब मलिक चौथ्या लग्नाचा विचार करत आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूया…

या अभिनेत्रीसोबत शोएबचे नाव जोडले जात आहे
वास्तविक पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईदला रमजानमध्ये एका शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. जिथे होस्टने तिला विचारले की तिला सोशल मीडियावर काही फ्लर्टी संदेश मिळतात का? अभिनेत्रीने उत्तर दिले की तिला क्रिकेटर्सकडून खूप फ्लर्टी मेसेज येतात. ज्यावर होस्टने विचारले की हा शोएब मलिक आहे का? यावर अभिनेत्री हसली आणि उत्तर देणे टाळले.

सना जावेदसोबत लग्न करण्यापूर्वी शोएब मलिक (Shoaib Malik) अभिनेत्री आणि मॉडेल आयशा उमरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. त्याने मॉडेल्ससोबत काही फोटोशूटमध्येही भाग घेतला. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

दरम्यान भारतीय टेनिस महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने ‘खुला’च्या माध्यमातून शोएब मलिकला घटस्फोट दिला होता. त्यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले. ज्यानंतर शोएब मलिक पुन्हा एकदा त्याच्या वर्तनामुळे चर्चेत आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती