Ruturaj Gaikwad | कर्णधार रुतुराजचे टेन्शन वाढले, धाकड गोलंदाज मायदेशी परतला; अर्ध्यातच सोडली सीएसकेची साथ

नवीन कर्णधार रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 मध्ये दमदार सुरुवात केली आहे. सीएसकेने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी दोन सामन्यांत विजयाची चव चाखली आहे. तथापि, संघाला विजय मिळवून देण्यात बॉलने महत्त्वाची भूमिका बजावलेल्या गोलंदाजाने स्पर्धेच्या मध्यभागी सीएसकेची साथ सोडली आहे. धोनीचे मुख्य शस्त्र घरी परतल्याने सीएसकेच्या कॅम्पमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

खरे तर, चेन्नई सुपर किंग्ज ((Ruturaj Gaikwad)) सोडून मायदेशी परतलेला गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेच्या व्हिसाच्या प्रक्रियेमुळे मुस्तफिझूरला बांगलादेशला परतावे लागले. मुस्तफिजूर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

केकेआरविरुद्धही खेळणे कठीण
यासोबतच तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापर्यंत संघात सहभागी होऊ शकेल की नाही हे देखील अद्याप निश्चित झालेले नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, पासपोर्ट मिळाल्यानंतरच मुस्तफिझूर रविवार किंवा सोमवारपर्यंत भारतात परत येऊ शकेल. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

क्रिकबझशी बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे ऑपरेशन्स चेअरमन जलाल युनूस म्हणाले, “मुस्तफिजूर काल रात्री आयपीएलमधून आगामी टी20 विश्वचषकासाठी व्हिसा प्रक्रियेसाठी परतला. तो उद्या (4 एप्रिल) त्याच्या बोटांचे ठसे देईल आणि त्यानंतर भारतात जाऊन सीएसकेच्या संघासोबत सामील होईल.”

मुस्तफिझूरची कामगिरी अप्रतिम आहे
मुस्तफिजुर रहमानची आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंतची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. मुस्तफिजूरने सीएसकेकडून खेळल्या गेलेल्या 3 सामन्यात आतापर्यंत 7 विकेट घेतल्या आहेत. पहिल्याच सामन्यात बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजाने चार विकेट घेतल्या होत्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती