शिवरायांवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय कुणीच केला नाही; शरद पवारांची टीका 

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका अन्याय दुसऱ्या कोणीही केला नाही,’ असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असून या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले,  काही लोकांनी शिवचरित्राबाबत अर्धवट आणि धादांत खोटी माहिती पसरवली. त्यातील काही पुस्तके महाराष्ट्रात खूप खपली. घराघरांत ठेवली गेली. त्यात बाबासाहेब पुरंदरे यांचंही पुस्तक होतं. मात्र, माझ्या मते पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांवर मोठा अन्याय केला आहे. रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते का हा आजचा विषय नाही. मात्र, सखोल अभ्यासानंतर वेगळी माहिती पुढं आली आहे हे मान्य करावं लागेल.

महाराष्ट्र सरकार आधी दादोजी कोंडदेव क्रिडा पुरस्कार द्यायचे. पण 2008 साली समिती सरकारने एक स्थापन केली आणि दादोजी कोंडदेव हे गुरु होते का याचा अभ्यास केला गेला. त्यातून असे समोर आले की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु किंवा मार्गदर्शक नवहते तर जिजाबाई मार्गदर्शक होत्या , हे अभ्यासातून पुढं आलं, याकडं पवारांनी लक्ष वेधलं.