MI vs PBKS | मुंबई इंडियन्सची ‘गुंडागर्दी’? पंजाब किंग्जविरुद्ध पंचांनी सॅम करनकडे केले दुर्लक्ष

MI vs PBKS DRS Controversy | आयपीएल 2024 च्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. पण या सामन्यात अशी एक घटना घडली, जी पाहून तुम्हालाही मुंबईचा संघ स्पर्धेत ‘गुंडागर्दी’ करत आहे, असे म्हणायला भाग पडेल. डीआरएसबाबत विरोधी संघ पंजाब किंग्जच्या कर्णधाराचेही ऐकले नाही. आता या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊ.

मुंबईच्या (MI vs PBKS) पहिल्या डावातील फलंदाजीदरम्यान, डगआऊटमधून संघाला रिव्ह्यू घेण्याचे संकेत मिळताच 15व्या षटकातील शेवटचा चेंडू वाइड देण्यात आला. या संपूर्ण घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, अर्शदीप सिंग फलंदाज सूर्यकुमार यादवला वाइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वीही होतो. या चेंडूने षटक संपणार होते तेव्हा मुंबईच्या डगआऊटमध्ये बसलेल्या टीम डेव्हिडने झटपट रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले.

डेव्हि़डपासून लपतछपत इशारा देण्याचा प्रयत्न करतो. परंतु डेव्हिड दोनदा त्वरीत पुनरावलोकन घेण्यास सूचित करतो. डेव्हिडचे हावभाव पाहून पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम कुरन अंपायरला काहीतरी म्हणतो पण अंपायर त्याचे बोलणे ऐकून घेत नाही. यानंतर, मुंबईच्या बाजूने वाइड बॉलसाठी रिव्ह्यू घेतला जातो आणि नंतर फील्ड अंपायर आपला निर्णय बदलतो आणि बॉल वाइड घोषित करतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले