मोहित कंभोज यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला तो दहशत निर्माण करण्यासाठी होता – भाजपा

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी (Ravi) यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण ( Rana Couple will recite Hanuman Chalisa ) करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला ( Shivsainik’s Attack on Mohit Kamboj’s Car ) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. मोहित कंबोज इथे आलाच कसा, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे.

दरम्यान, काल भाजपनेते मोहित कंभोज यांच्यावर देखील शिवसेनेने हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप होऊ लागला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याच दोन्ही मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे.  राज्यात कायदा सुव्यवस्थेचे उघडपणे धिंडवडे निघतायेत. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची पोलिसांच्या उपस्थितीतच दादागिरी चालू आहे. असं त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, राणा दांपत्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे खासदार आमदार नेतेमंडळी शिवसैनिक मातोश्रीवर जमले आहे. राज्यातील गृहखात्यावर, पोलिसांवर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास नाही का? असं असेल तर तात्काळ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं? भाजपा नेते मोहित कंभोज यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला तो दहशत निर्माण करण्यासाठी होता. या अशा हल्ल्यांना भाजपा घाबरत नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे.