पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार ? 

मुंबई – पहिला ‘लता मंगेशकर पुरस्कार’ (Lata Mangeshkar Award) पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendera Modi)  यांना जाहीर झाला आहे. नरेंद्र मोदींना या पुरस्काराने 24 एप्रिलला मुंबईत ( Mumbai )सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल (shanmukhanand hall) येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उषा मंगेशकर ( Usha Mangeshkar ) यांच्या हस्ते ‘लता दिनानाथ मंगेशकर’ हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दरम्यान, आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) हे एकाच व्यासपीठावर येतील अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांना देखील या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण असून  सध्या भाजपा आणि शिवसेनेत ( Shivsena ) जोरदार संघर्ष सुरु असताना हे दोन मोठे नेते आता एका व्यासपीठावर येणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.