‘शिवसेना फक्त गुंडगिरी आणि सत्तेचा उपयोग करून दडपशाही करू शकते’

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी (Ravi) यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण ( Rana Couple will recite Hanuman Chalisa ) करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला ( Shivsainik’s Attack on Mohit Kamboj’s Car ) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. मोहित कंबोज इथे आलाच कसा, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप होऊ लागला आहे. भाजप आमदार संजय कुटे यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले,  शिवसेना काय करू शकते, तर शिवसेना फक्त गुंडगिरी आणि सत्तेचा उपयोग करून दडपशाही करू शकते. असं त्यांनी म्हटले आहे.

मनसेचे प्रवक्ते योगेश चिले (Yogesh Chile) यांनी देखील शिवसेनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मोहित कंबोज हनुमानचालिसा पठनासाठी भोंगे वाटप करत होते याचा राग मनात ठेऊन शिवसेनेच्या आमदार आणि शिवसैनिकांनी पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्यावर हल्ला केला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनित राणा यांनी हनुमानचालिसा पठन करू नये म्हणुन शिवसैनिक एकवटलेत तर, उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांनी नमाज सुरू असताना हनुमानचालिसा पठन करू नये असे फर्मान काढले…हनुमान चालिसा पठन करण्याला एवढा टोकाचा विरोध करणारी शिवसेना स्वतःला कितीही हिंदुत्ववादी दाखवायचा प्रयत्न करेल तरीही हिंदू आता भरोसा ठेवणार नाहीत. शिवसेनेने हिंदूंचा विश्वासघात केला आहे असं देखील चिले म्हणाले.