बॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिकेचा मृत्यू, खोलीत संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह!

Singer Mallika Rajput Committed Suicide : प्रसिद्ध गायिका मल्लिका राजपूत (Mallika Rajput ) हिने आत्महत्या केली आहे. तिचा मृतदेह तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मल्लिका राजपूतच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. गायिकेचा मृतदेह तिच्या सुल्तानपूर येथील घरात सापडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मल्लिका राजपूतने आत्महत्या केली?
माध्यमांतील वृत्तांनुसार, मल्लिका राजपूतने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तिचा मृतदेह तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मल्लिकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. तिच्या निधनानंतर चाहत्यांकडूनही शोक व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

मल्लिका राजपूतच्या आईच्या म्हणण्यानुसार, मल्लिकाने प्रदीप शिंदे जनार्दन याच्याशी लग्न करून गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी घर सोडले होते. काल रात्री मल्लिकाचा तिच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण इतके वाढले होते की, पोलिसांना वाद सोडवायला यावे लागले. यानंतर काय झाले आणि मल्लिकाने आत्महत्या कशी केली? अशा सर्व प्रश्नांचा आता पोलीस तपास करत आहेत. ती नशेत होती, असे पोलिसांचे म्हणणे असले, तरी अहवाल आल्यानंतरच खरी माहिती समोर येईल.

कंगना राणौतसोबत काम केले
प्रसिद्ध गायिका मल्लिका राजपूतने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सोबत काम केले आहे. याशिवाय तिने आपल्या आवाजाने लोकांची मने जिंकली आहेत. मल्लिका राजपूतने तिच्या यारा तुझे म्युझिक अल्बमने खूप लोकप्रियता मिळवली होती. इतकेच नाही तर मल्लिकाने अनेक वेब सीरिज, सीरियल आणि अल्बममध्येही आपली जादू दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया