‘ज्यावेळेस एसटी कामगार उपाशी पोटी लढा देत होते, त्यावेळेस सिल्वर ओकवरून साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही’

पुणे – मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी (ST staff) आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय. बँकेची निवडणूक (Bank election) घोषीत केलीये आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय अशी घणाघाती टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. १९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली आणि सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली ५०० रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम. अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केले. त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या.

पुढे बोलताना ते म्हणाले, पण  ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होतो. त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या  सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं  नाही. जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार ( We will teach the Mughals a lesson ) आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत.