रतन टाटांसोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या शंतनूने खरेदी केली स्वत:ची कार

Ratan Tata Shantanu Naidu Tata Safari: भारतातील दिग्गज आणि सर्वात लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्यासोबत नेहमी सावलीप्रमाणे राहणारा तरुण मित्र शंतनू नायडू (Shantanu Naidu) याने एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे. आतापर्यंत टाटा नॅनोमध्ये प्रवास करणाऱ्या शंतनूने गेल्या महिन्यात टाटा मोटर्सचीच नवीन सफारी फेसलिफ्ट खरेदी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, नवीन सफारी घेतल्यानंतर शंतनूने सर्वात आधी रतन टाटांना दाखवली.

रतन टाटांचे मॅनेजर आणि गुडफेलोचे संस्थापक शंतनू नायडूने नवीन टाटा सफारी फेसलिफ्टचे टॉप एंड व्हेरिएंट, अकम्प्लिश्ड प्लस खरेदी केले आहे, ज्याची किंमत 27 लाखांपेक्षा जास्त आहे. भारतातील नवीन सफारीची डिलिव्हरी घेणारा शंतनू हा पहिला ग्राहक आहे. रतन टाटा यांनी स्वतः कौतुकाने शंतनूच्या पहिल्या एसयुव्हीची पाहणी केली. विशेष म्हणजे, यापूर्वी शंतनू ‘रतन टाटांची ड्रीम कार’ टाटा नॅनो चालवत असत.

शंतनूच्या कंपनीत टाटांची गुंतवणूक
रतन टाटांचे व्यवस्थापक मानले जाणारे शंतनू नायडू त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. शंतनू आणि टाटांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये शंतनू स्वतःच्या हाताने टाटांना केक भरवताना दिसत आहेत. दरम्यान, रतन टाटा यांनी शंतनूच्या स्टार्टअप गुडफेलोजमध्ये गुंतवणूक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-