औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता; जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा ओकली गरळ

ठाणे – छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेपार्ह विधान केलं. त्यावर भाजप राज्यात आक्रमक झाली आहे. यातच आता हिंदुंवर अनन्वित अत्याचार करणारा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबचा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुळका आला आहे. कारण औरंगजेब हा काही हिंदूद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य माजी जितेंद्र आव्हाड (Jitendra avhad on Aurangzeb )यांनी नुकतंच केलं आहे.

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर भाष्य करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय.हिंदुत्ववादी आणि भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.संभाजी महाराज यांचे ज्याठिकाणी डोळे फोडले, तिथे विष्णूचं मंदिर होतं. मग औरंगजेब हिंदूद्वेष्टा असता किंवा क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?, असा सवालही आव्हाड यांनी विचारला.

सावरकरांनी आणि गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवले आहे? ते वाचा… या शूरवीरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे ‘स्त्रीलंपट’ आणि ‘व्यसनाधीन’ होते. यावर कोणी बोलेल का?, असा सवाल आव्हाड यांनी भाजपला विचारला आहे. संभाजी महाराज यांचे ज्याठिकाणी डोळे फोडले, तिथे विष्णूचं मंदिर होतं. मग औरंगजेब हिंदूद्वेष्टा असता किंवा क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?, असा सवालही आव्हाड यांनी विचारला.