ओबीसी आरक्षणावरून आम्हाला बोलणाऱ्या फडणवीसांना जनाची नव्हे मनाची तरी लाज वाटली पाहिजे

जळगाव : महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप ओबीसी (BJP OBC) मोर्चाच्या मेळाव्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन (OBC Political Reservation) महाविकास आघाडी सरकारवर टीका केल महाविकास आघाडी सरकारनं (MVA) ओबीसी आरक्षणाचा खून केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.

या बैठकीत ओबीसी आरक्षणा मिळेपर्यंत भाजप २७ टक्के तिकीटं ओबीसींना देणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप ओबीसी मोर्चानं महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाडला आहे. तुम्ही सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा जनतेसमोर आणला आहात आणि रस्त्यावर सातत्यानं ओबीसींच्या प्रश्नावर मार्ग काढण्यास भाग पाडलं आहे, असंही फडणवीस म्हणाले.

तत्कालीन काँग्रेस (Congress) सरकारनेही ओबीसींकडे दुर्लक्ष केले असून, त्यांच्याकडून ओबीसींचा वापर केवळ दिखाव्यापुरताच केला गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे मालक ओबीसींना कधीच आरक्षण मिळू देणार नाहीत. त्यामुळे जनता आणि ओबीसींनी सत्तेशी संघर्ष करण्यासाठी तयार रहावे, असे आवाहनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ओबीसी आरक्षणाविषयी कोणताही निर्णय न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी जळगावमध्ये केली आहे.जे आम्हाला सांगत आहेत की सांगत आहेत की ओबीसी आरक्षण आमच्यामुळे (महाविकास आघाडी) गेलं त्यांना खरंतर जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. कारण ज्यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही. त्या विचारधारेने आम्हाला सांगावं की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहोत.

माझं हे स्पष्ट मत आहे की मागच्या पाच वर्षांच्या काळात भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील सरकारने आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती त्यावेळी जो इम्पेरिकल डेटा (Imperial data) देणं अपेक्षित होतं ते दिलं नाही. हा ओबीसींचा डेटा केंद्र सरकारने दिला नाही. त्यामुळे हे त्यांचं अपयश आहे. आज आम्हाला ते जबाबदार धरत आहेत. निकाल लागल्यानंतर ते आमच्यावर जबाबदारी टाकत आहेत हे चुकीचं आहे. लोकांचा बुद्धीभेद करणं ही भाजपची पद्धत आहे आत्ताही ते आरक्षणाच्या मुद्द्यावर तेच करत आहेत असं म्हणत धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.