ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णींवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तटकरेंनी केला तीव्र निषेध; आरोपींना तात्काळ अटक करा

Sunil Tatkare On Heramb Kulkarni Attack – न्यायालयात होणारा युक्तीवाद हा मराठीत नाही तर इंग्रजीत होतो आहे मात्र अश्रू ढाळणार्‍यांना तिथला युक्तीवाद हा मराठीत आहे की इंग्रजीत हे कळू शकले नाही असा टोला लगावतानाच त्यामुळेच लोकांमध्ये वेगळे चित्र निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कालपरवा काहींच्या डोळ्यात अश्रू आले. आदरणीय शरद पवारसाहेबांचा (Sharad Pawar) उल्लेख न्यायालयात एकेरी पध्दतीने झाला असे अश्रूला वाट देत मोकळेपणाने सांगण्याचा प्रयत्न काहींनी केला असा टोला लगावतानाच या युक्तीवादाची माहिती घेतली त्यामध्ये जो उल्लेख एका ‘पॅरा’ मध्ये करण्यात आला आहे त्याचा संदर्भ पूर्वीचा आहे तो संदर्भच वाचण्यात आला. आधीच्या याचिकेतील जो निर्णय दिला गेला होता त्यातील ‘पॅरा’ वाचण्यात आला. अनेक वेळा पाहतो की इंग्रजीमध्ये उल्लेख करताना ‘he said so’ , ‘he did so’ असे म्हणत असतो मराठीत आदरातिथ्य म्हणून ‘ते’ म्हणत असतो. तर एकेरी शब्दाचा उल्लेख कधी उच्चारला जातो. इंग्रजीत ‘he’ हा एकच शब्द आहे त्यामुळे तिथे होणारा युक्तीवाद हा मराठीत नाही असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आमच्यावतीने युक्तीवाद सुरू आहे. आमच्या याचिकेत जे मुद्दे उपस्थित केले होते त्यासंदर्भातील आमची भूमिका कायदेशीर कसोटीवर कशी योग्य आहे हे त्याठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

आजचा युक्तीवाद हा कायद्याच्या कसोटीवर अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य कसा आहे ती बाजू मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी यांच्यावर अज्ञात व्यक्तीने जो भ्याड हल्ला केला त्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला. राज्यसरकारने गृहविभागाची यंत्रणा लावून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणीही केली.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला सुनिल तटकरे यांनी योग्य आणि अचूक उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

मंदबुद्धी मूल जन्माला येऊ नये यासाठी कोणती चाचणी करावी? वेळेत केला जाऊ शकतो उपचार

वाराणसीमध्ये आहे हनुमानजींचे भव्य-दिव्य मंदिर, ‘संकट मोचन हनुमान मंदिरा’चे महत्त्व घ्या जाणून

भाजप खासदाराचा मुलगा पोस्टमन बनून घरोघरी पत्रे पोचवायला गेला, तेव्हा लोकांची होती ‘ही’ प्रतिक्रिया