गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा; जितेंद्र आव्हाडांचा खोचक सल्ला 

ठाणे – गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह (Petrol-diesel) अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे (Gas cylinder) दरही वाढत असून, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ झाली आहे.

आधीच लॉकडाउननंतर (Lockdown) सामान्य माणसाचे जगणे असह्य झाले असताना, आता केंद्रातील सरकारने महागाईचा आणखी एक धक्का दिल्याने सामान्य माणूस गॅसवर गेला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात तब्बल ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पन्नास रुपयांच्या वाढीसह 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरचे (cylinder) दर आता ९९९.५० रुपयांवर पोहोचले आहेत. इथून पुढे एका सिलिंडरसाठी एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडर महागल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट (Financial budget) कोलमडणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गॅस दरवाढीवरून टीका करताना आता गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा, असा खोचक सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड  (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत घरगुती गॅसचा भाव परत वाढला, गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा, असे म्हटले आहे.