अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल – देवेंद्र फडणवीस 

मुंबई   – अनैर्सागिक आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा पवार-ठाकरे यांचा प्रयत्न अखेर फेल झाला आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केवळ मुख्यमंत्री पदाचा नव्हे तर विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.  सोशल मिडीयावरून जनतेशी संवाद साधत त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

दरम्यान, राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची राजभवन इथं भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू पदभार सांभाळण्यास सांगितलं आहे.

दरम्यान,  या घडामोडींदरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उतायचं नाही, मातायचं नाही, जनतेचं काम करायचं. अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव झाला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला.अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल. या संपूर्ण लढाईत भाजपाच्या आमदारांची भूमिका महत्त्वाची होती. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक भूमिका घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचेही मी आभार मानतो.असं ते म्हणाले.