आणखी एक घोटाळा : ‘या’ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील घोटाळ्यांची विविध प्रकरणे समोर येत आहेत. यातच आता आणखी एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात (Nashik Agricultural Produce Market Committee) ED कडे तक्रार करण्यात आली आहे.

नाशिक बाजारसमितीत 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भाजपा पदाधिकाऱ्यांनी ईडीकडे केली आहे. सध्या नाशिक (Nashik) बाजारसमितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सत्ता आहे. 2013-14 च्या लेखपरिक्षणात हा घोटाळा उघड झाल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तब्बल 20 वर्षात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

सरकार आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पुराव्यांची अनेक कागदपत्रं ही ED कडे सादर केली आहेत. तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. नाशिक भाजप पदाधिकारी दिनकर पाटील, सुनील केदार यांनी दाखल तक्रार दाखल केली आहे.