विधान परिषद निवडणुकीत कुणाचा पराभव होणार ? अनिल बोंडे यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई – विधान परिषदेच्या (Legislative Council elections) दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena, Bharatiya Janata Party, Congress and NCP) असे चारही पक्ष आपआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीनं पार पडणार आहे.

दरम्यान, आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी हे सूचक ट्विट केलं आहे. काळ आला होता भाऊ किंवा भाईंवर, पण मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार’, असं ट्विट अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं आहे.