जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन, एकावेळी थांबू शकतात ४४ रेल्वेगाड्या

अमेरीकेच्या न्युयॉर्क शहरात जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन (Biggest Railway Station) आहे. या रेल्वेस्टेशनची खासियत अशी की, या स्टेशनवर एकावेळी ४४ रेल्वेगाड्या थांबू शकतात.

ग्रँड सेंट्रल टर्मिनल (Grand Central Terminal) असे या रेल्वे स्टेशनचे नाव असून याची निर्मीती १९०१ ते १९०३ करण्यात आली. हे स्टेशन जेव्हा बांधण्यात आले तेव्हा मशिन्स उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे या स्टेशनच्या निर्मितीसाठी १० हजार कामगार एकावेळी दिवस रात्र कष्ट करत होते.

हे रेल्वे स्टेशन वास्तुकलेसाठीही ओळखले जाते. स्टेशन्सच्या भिंतींवर केलेले कोरीव काम हे भुरळ पाडणारे आहे. टर्मिनलच्या मुख्य लॉबीमधील १० झुंबर सोन्याचे आहेत. या स्टेशनवर अनेक सिनेमांचे शुटिंगही झाले आहे.

या स्टेशनवरुन दिवसाला ७ लाख लोक प्रवास करतात. तर असंख्य गाड्या ये-जा करतात.

(हे पण माहिती असू द्या : भारतातील उत्तर प्रदेशचे मथुरा हे रेल्वे स्टेशन सर्वात मोठे रेल्वे स्टेशन मानले जाते.)