राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले, राज्यात पोलिस दल आहे की नाही? विद्या चव्हाण यांचा राज्य सरकारला प्रश्न

मुंबई-राज्यात दिवसाढवळ्या महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना वाढल्या आहे. मात्र राज्य सरकार खातेवाटप आणि मलाईदार खाते मिळावे याकरिता सरकारमधील मंत्री जुटले आहे. राज्यातील महिला व मुली असुरक्षित आहे. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की राज्यात पोलीस दल आहे की नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे मात्र या घटनेचा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी चौकशी देखील केली नाही राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर लैंगिक अत्याचाराचे घटनेचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र मध्ये वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांमध्ये राज्य सरकार विरोधात चीड निर्माण झाली आहे मात्र राज्याचे गृहमंत्री यांना चाळ नाही मुंबई मध्ये देखील अशाच प्रकारे लोकल ट्रेनमध्ये काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. साडेचार हजारापेक्षा अधिक लहान मुली हरवल्या आहे. मात्र राज्यातील राज्यकर्ते राजकारणामध्येच व्यस्त आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षा आणि प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे असे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्यातील महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे मात्र राज्य सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नाही आहे तर राज्य सरकारमधील मंत्री मलाईदार खाते कसे मिळणार यातच गुतलेले आहे. राज्यात महिलांवर वाढत असलेल्या अत्याचारांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये राज्य सरकार विरोधात रोष निर्माण झाला आहे. या किडासवाने राजकारणाची सर्वसामान्यांमध्ये संतापची लाट आहे. मात्र राज्याचे गृहमंत्री यांना चाळ नाही यापुढे महाराष्ट्रात अशी घटना केव्हाच घडली नव्हती असे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे.