राहुल गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव; महिलेने केली राहुल गांधी यांच्या नावावर संपत्ती  

नवी दिल्ली-  उत्तराखंड (Uttrakhand ) इथल्या एका वृद्ध महिलेने आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावावर केली आहे. उत्तराखंडची राजधानी देहरादून मधल्या नेहरु कॉलनी डालनवाला (Dalanwala) मध्ये राहणाऱ्या पुष्पा मुंजियाल यांनी आपला वारस म्हणून राहुल गांधी यांची घोषणा करत संपूर्ण संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे.

संपत्ती दान करणाऱ्या महिलेचं नाव पुष्पा मुन्जियाल (Pushpa Munjiyal) आहे, त्यांचं वय 79 वर्षे आहे. जी संपत्ती गांधी यांच्या नावावर करण्यात आली आहे या संपत्तीमध्ये 50 लाख रुपयांची एफडी आणि 10 तोळं सोन्याचा समावेश आहे. दरम्यान, याआधी त्यांनी 2011 मध्ये त्यांनी दून या सरकारी रुग्णालयाला 25 लाख रुपयांचं दान दिलं होतं. हे पैसे गरिबांच्या इलाज, औषधांसह रुग्णालयातील मशिनच्या देखरेखीसाठी खर्च करण्यासाठी दिले होते.

पुष्पा मुंजियाल यांनी आपली संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर करत ते मृत्युपत्र देहरादून कोर्टातही सादर केलं आहे. त्यांनी कोर्टात आपल्या संपत्तीचं विवरण देताना म्हटलं की, माझ्यानंतर माझ्या संपूर्ण मालमत्तेची मालकी राहुल गांधी यांच्याकडे सोपवावी. असं म्हटले आहे. माझ्यावर राहुल गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. अशी माहिती देखील या महिलेने दिली.