LokSabha Election 2024 | भाजपात गेलेल्या माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे, कॉंग्रेस नेत्याचे लक्ष्यवेधी वक्तव्य

2024 च्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) सर्व कुटुंबांमध्ये राजकीय लढा होत असताना केरळमध्ये देशाचे माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी आपला मुलगा अनिल अँटनी निवडणूक हरावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांनी आपल्या मुलाविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. माझ्या मुलाला निवडणुकीत पराभूत करणे गरजेचे असल्याचे अँटनी यांनी म्हटले आहे.

अनिल अँटनी हे केरळच्या पठाणमथिट्टा लोकसभा मतदारसंघातून (LokSabha Election 2024) भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. वडील एके अँटनी यांनी आता मुलाच्या पराभवासाठी प्रार्थना केली आहे. अँटनी आपल्या मुलाच्या विरोधात प्रचार करत आहेत.

इंडिया आघाडी आणि आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात लढतो आहे. माझ्या मुलाने म्हणजेच अनिलने भाजपात जाऊन चूक केली. त्याचा पराभव झाला पाहिजे असं आता ए.के. अँटनी म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा