राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व मुंबईत अनेक पक्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे – तटकरे

Sunil Tatkare – समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिल्यानंतर एक तर्‍हेचे चैतन्य मुंबईत पहायला मिळत असून आपल्या पक्षाचे अस्तित्व अनेक पक्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी समीर भुजबळ यांच्या कामाचे कौतुक केले.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी अर्शद अमीर, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षपदी अजय विचारे, पश्चिम मध्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी सिध्दार्थ कांबळे, आणि ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्षपदी सुरेश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई युवक अध्यक्षपदी सिध्दीविनायक मंदिराचे विश्वस्त सुनील गिरी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आणि महिला कार्याध्यक्षपदी आरती साळवी (दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई) आणि मनिषा तुपे (ईशान्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबई) या दोन महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी दोन्ही महिला कार्याध्यक्षांना जिल्हयांची जबाबदारीही देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे चार जिल्हाध्यक्ष, युवक अध्यक्ष आणि दोन महिला कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात जाहीर केली.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली

सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे – Devendra Fadnavis