येरवडा तुरुंगातून पळालेला गुंड आशिष जाधवला आईवडिलांनी केले पोलिसांसमोर हजर

Ashish Jadhav: येरवडा (Yerwada Jail) येथील खुल्या कारागृहामधून पळून गेलेल्या कैदी क्रमांक सी-९४९ आशिष भरत जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे. आईला हृदय विकाराचा झटका आल्याने तो काळजीपोटी घरी पळून गेला होता. दरम्यान, त्याच्या आईवडिलांनी त्याला पोलिसांसमोर हजर केले. त्याला येरवडा पोलिसानी (Yerwada Police) ताब्यात घेतले आहे.

तुरुंग अधिकारी हेमंत पाटील यांनी कैदी पळून गेल्याची तक्रार येरवडा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी जाधववर गुन्हा दाखल केला होता. जाधव कुख्यात गुंड असून, त्याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने २६ मे २०१४ रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तो १६ ऑगस्ट २०२२पासून खुल्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. जाधवने सोमवारी दुपारी सुरक्षारक्षकांची नजर चकवून कारागृहातून पलायन केले होते.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली

सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे – Devendra Fadnavis