Match fixing मध्ये रिझवानची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात… ICC ने 17 वर्षांची घातली बंदी

ICC bans Rizwan Javed : क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचे (Match fixing) भूत समोर आले आहे. अबू धाबी टी10 लीगमधून ही बाब समोर आली आहे. यावेळी इंग्लंडचा क्लब क्रिकेटर रिझवान जावेदवर मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यावर कडक कारवाई केली.

आयसीसी ने रिझवानवर 17 वर्षांची बंदी घातली आहे. ही बंदी इतकी मोठी आहे की या खेळाडूची कारकीर्द संपुष्टात येईल. रिजवान जावेदवर 2021 मध्ये अबू धाबी टी10 लीग दरम्यान सामने फिक्स (Match fixing) करण्याचा अनेक प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

रिझवान आपल्यावरील आरोपांना उत्तर देऊ शकला नाही
या मुद्द्यावरून खटला सुरू होता. पण आता आयसीसीने रिझवानला दोषी ठरवले आणि त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून 17 वर्षांची बंदी घालण्यात आली. आपल्यावरील या सर्व आरोपांना उत्तर देण्यात रिझवान अपयशी ठरल्याचे सांगण्यात आले.

यानंतर आयसीसीने कारवाई करत ही बंदी लागू केली, जी 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने 2017 मध्ये अबू धाबी टी10 लीग सुरू केली. रिझवान हा 8 खेळाडू आणि अधिकाऱ्यांपैकी एक आहे ज्यांच्यावर आयसीसीने ईसीबीच्या वतीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोप लावले होते.

हा अधिकारही या इंग्लिश क्रिकेटपटूकडून काढून घेण्यात आला
या आरोपींमध्ये बांगलादेशचा अष्टपैलू नासिर हुसेनचाही समावेश असून त्याच्यावर सध्या दोन वर्षांची बंदी आहे. कलम 2.1.1, कलम 2.1.3, कलम 2.4.4 आणि कलम 2.4.6 सह लाचलुचपत प्रतिबंधक संहितेच्या विविध कलमांतर्गत रिझवानवर बंदी घालण्यात आली आहे. रिझवानकडून सुनावणीचा अधिकारही काढून घेण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?