‘छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांनी घालून दिलेल्या मार्गानेच भारत जोडो यात्रेचे मार्गक्रमण..’

मेडशी : भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) कन्याकुमारीपासून सुरू झाली असून श्रीनगरमध्ये जाऊनच थांबणार आहे. या पदयात्रेत दररोज हजारो लोक भेटून त्यांच्या समस्या सांगतात, तरुण मुले मुली शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत. शेतक-याच्या शेतमलाला भाव मिळत नाही. काही राजकीय पक्षाचे नेते येतात आणि मन की बात करतात पण मी तुमची मन की बात ऐकण्यास आलो आहे, असे खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही यात्रा आहे. ही पदयात्रा सर्वांना बरोबर घेऊन चालत आहे. शेतकरी, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांची जात वा धर्म न विचारता यात्रा सुरू आहे. सर्व जण एकाच ध्येयाने निघाले आहेत ते म्हणजे, नफरत छोडो, भारत जोडो.