उर्फी जावेद मुलगी नसून एक तृतीयपंथी आहे? प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई- सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. बऱ्याचदा आपल्या कपड्यांमुळे उर्फी वादातही अडकली आहे. तिच्यावर सातत्याने टीकाही होत असते. अशातच आता अभिनेता फैजान अन्सारीने (Faizan Ansari) उर्फीबाबत धक्कादायक विधान केलं आहे. उर्फी ही मुलगी नसून ती चक्क तृतीयपंथी असल्याचं खळबळजनक वक्तव्य अन्सारीने केलं आहे.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अन्सारीने उर्फी जावेद तृतीयपंथी असल्याचं म्हटलं आहे. “उर्फी जावेद मुलगी नसून एक तृतीयपंथी आहे. ती ज्या पद्धतीने बोलते. जसे कपडे घालते, यावरुन हे सिद्ध होतं. ती तृतीयपंथी असल्याचे काही पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास ती मुलगी नसून तृतीयपंथी असल्याचं तुमच्या लक्षात येईल,” असं अन्सारीने म्हटलं आहे.

तृतीयपंथी असल्याचं उर्फीने स्वत: मान्य करावं अन्यथा तिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार असून पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचंही अन्सारी म्हणाला आहे. याआधी अन्सारीने उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता.