भरधाव वेगाने धावणाऱ्या BMWने तोडली ऐतिहासिक अजनी पूलाची भिंत

नागपूर : शहरातील ब्रिटिश कालीन ऐतिहासिक अजनी पूलावर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणारी BMW कार थेट पूलाच्या भिंतीवर आदळली. त्यामुळे ११० वर्षांहून अधिक जुना असणाऱ्या अजनीच्या पूलाची भिंत एका बाजूने तुटली.

अजनी रेल्वे स्थनिक नजीक असणारा अजनी रेल्वेपूल जवळपास ११० वर्ष जुना आहे. या पूलाला १०० वर्षेपूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी भारतीय रेल्वेला पत्र पाठवून या पुलाचे आयुष्य संपल्याची माहिती दिली होती. त्यामुळे महानगर पालिका या पूलाची डाग डुजी करून नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे सांगितले जात आहे.

अशा या ऐतिहासिक पूलाची भिंत मंगळवारी रात्री कारच्या अपघातामुळे तुटली. मिळालेल्या माहितीनुसार, BMW ही कार वेगाने होती, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही कार थेट पूलाच्या भिंतीवर आदळली. या कार मध्ये तीन व्यक्ती बसले होते. जे अपघातात सुखरूप असल्याचे सांगितल्या जात आहे.