सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी 

शेअर बाजारात (Share Market) मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चांगली तेजी दिसून आली. BSE सेन्सेक्स 311.21 अंकांनी उसळी घेत 60,152.24 वर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी 99.20 अंकांच्या वाढीसह 17,723.25 अंकांवर बंद झाला. आजच्या व्यवहारात बँकिंग समभागांनी जोरदार वाढ नोंदवली. कोटक महिंद्रा बँकेच्या समभागात सर्वाधिक 4.64 टक्क्यांची वाढ दिसून आली.

कोटकचा शेअर 1840 रुपयांवर बंद झाला. निकालाचा हंगाम सुरू झाल्याने अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. चौथ्या तिमाहीत कंपन्यांची कमाई चांगली होऊ शकते, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. कंपन्यांचा नफा सुमारे 15 टक्के अपेक्षित आहे.