रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याचे दागिने चोरणाऱ्या चोराला अटक, घरातील ‘या’ सदस्याने केला हा गुन्हा

Aishwarya Rajinikanth : साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांची मोठी मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) रजनीकांत सध्या चर्चेत आहे. अलीकडेच ऐश्वर्या रजनीकांतने तिच्या लॉकरमधून लाखोंच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा खुलासा केला. याप्रकरणी चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री ऐश्वर्या रजनीकांतनेही चेन्नई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांनी ऐश्वर्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि चोरीच्या आरोपात अभिनेत्रीच्या घरातील मोलकरीण आणि कार चालकाला अटक केली.

ऐश्वर्या रजनीकांतने पोलीस तक्रारीत सांगितले होते की, चेन्नई (Chennai) येथील घराच्या लॉकरमधून सोन्याचे, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांसह 3 लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. ऐश्वर्या रजनीकांतच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला. अशा परिस्थितीत, पीटीआयच्या वृत्तानुसार, चेन्नई पोलिसांनी या प्रकरणात यश मिळवले आहे आणि ऐश्वर्या रजनीकांतच्या घरातील 18 वर्षीय मोलकरीण ईश्वरी आणि कार चालक व्यंकटेश यांना अटक केली आहे.

बराच काळ चित्रपट (Movie) निर्मात्याच्या घरी काम केल्यामुळे ईश्वरीला लॉकरच्या चावीची पूर्ण माहिती होती, असे पोलिसांनी सांगितले. यासोबतच ऐश्वर्या रजनीकांतच्या मोलकरणीने कार चालकाच्या सांगण्यावरून हे काम केले होते. तिने घर खरेदीसाठी दागिन्यांचा वापर केला, ईश्वरीकडून तिच्या घराशी संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत ही दक्षिणेतील दिग्गज कलाकार धनुषची माजी पत्नी आहे. ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष (Dhanush) यांनी नुकताच घटस्फोट घेतला आहे.