मोदींना ‘चोर’ म्हटल्याबद्दल राहुल गांधी दोषी, सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ‘चोर’ संबोधल्याप्रकरणी सुरत न्यायालयाने (Surat Court) गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवले आहे. हे प्रकरण 2019 शी संबंधित आहे जेव्हा वायनाडचे लोकसभा सदस्य, राहुल गांधी यांनी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या आडनावावर टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल म्हणाले, ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी असेच का असते?’ या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती.

जाणकारांच्या मते, राहुल गांधी यांना दोषी ठरवल्यामुळे त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. त्याचबरोबर 2 वर्षांची शिक्षाही जाहीर केली जाऊ शकते. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला आणि निकाल जाहीर करण्यासाठी २३ मार्च ही तारीख निश्चित केली. आज झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने राहुल गांधींना दोषी घोषित केले आहे.