२०१९ सालच्या निवडणुकीत ‘या’ दोन उमेदवारांना होता ओव्हर कॉन्फिडन्स; कार्यकर्त्यांची झाली होती मोठी निराशा

Sanjay Kadam and Sachin Dodake : २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधीच काही उतावीळ नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. काहींनी मिरवणूक काढल्या होत्या तर काहींनी विजयाचे बॅनर्स लावले होते. यापैकीच दोन नेते होते दापोलीचे संजय कदम आणि खडकवासल्याचे सचिन दोडके. या दोन्ही नेत्यांना अतिआत्मविश्वास नडल्याचे पाहायला मिळाले होते.

रत्नागिरीतील दापोलीत राष्ट्रवादीच्या संजय कदम यांनी निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढली होती. विशेष बाब म्हणजे संजय कदमांनी आतापर्यंत लढलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये निकालापूर्वीच विजय साजरा केला आहे. संजय कदम यांच्याविरुद्ध शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांचं तगडं आव्हान होतं आणि योगेश कदम यांचा विजयही झाला.

पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचे मतदान झाल्यानंतर वारजे भागात आमदार झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले होते तसेच फटाक्यांची आतषबाजी देखील केली होती. मात्र मतमोजणीत त्यांचा पराभव झाल्याचे समोर आल्याने कार्यकर्त्यांची मोठी निराशा झाली होती. या सर्व उमेदवारांचा हा कॉन्फिडन्स नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स होता हेच पराभवानंतर सिद्ध झालं होते.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली