Maratha Reservation: अजित पवारांकडून आमदार, खासदारांना दिल्या गेल्या ‘या’ खास सूचना

Ajit Pawar On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. यातच काही नेते मंडळी वादग्रस्त वक्तव्ये करून वाद निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणावरून वादग्रस्त विधानं टाळावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदारांना केल्या आहेत.

देवगिरी बंगला इथं आमदारांची बैठक झाली. त्यात अजित पवारांनी राज्यात आरक्षणावरून वाद नको अशी भूमिका मांडली. सध्या राज्यात भूजबळ आणि इतर नेत्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरील वक्तव्यावरून वाद सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपल्या आमदारांना विशेष सूचना दिल्या.

याशिवाय विकासनिधीवरही या बैठकीत चर्चा झाली. लवकरच या मुद्द्यावर तोडगा काढण्यात येईल असंही अजितदादांनी सांगितलंय. काही आमदारांनी बैठकीत विकास निधी मिळत नसल्यानं नाराजी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली