बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Silkyara : उत्तरकाशी इथे कोसळलेल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार, कामगारांना लवकरात लवकर वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य, लेफ्टनंट जनरल सैद अता हसनैन(Member of the National Disaster Management Authority, Lt. Gen. Said Ata Hasnain)  यांनी काल सांगितलं.

परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे मात्र तिथे कार्यरत असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि भारतीय सैन्यासह विविध प्राधिकरणांनी आवश्यक ती सर्व पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले.

एनडीआरएफ कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला हाताळण्यासाठी जागेवर सराव करत आहे. अडकलेल्या कामगारांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी उपकरणे पाठवण्याकरता अन्य योजनाही सुरू आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यातून खळबळजनक वृत्त पसरवू नये, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरचित्रवाणी वाहिन्यांना सांगितलं आहे. काल जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार बोगद्याच्या जवळून कोणतेही थेट प्रक्षेपण, किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असा सल्ला मंत्रालयाने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली