राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता; मातब्बर नेता शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता; मातब्बर नेता शिवसेनेच्या वाटेवर

Pune – पंढरपूरमध्ये युवा नेते भगीरथ भालके यांना गळाला बीआरएसने लावल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट संपर्कात असल्याची जोरदार चर्चा होत आहे, अशी बातमी दिव्य मराठी या दैनिकाने दिली आहे.

या वृत्तानुसार, गटबाजीने पिंपरीतील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला २०१४ च्या विधानसभेपासून तडे गेले. २०१९ मध्ये मविआचे सरकार आल्यावर भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीकडे झुकू लागले. मात्र, सत्ता बदलताच झुकणे थांबले. आता आमदार बनसोडे पक्षापासून दूर जात असल्याचे दिसून येत आहे.

ते पक्षाच्या कार्यक्रमांना अनेकदा दिसत नाहीत, पण गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरीत बनसोडेंच्या कार्यालयावर गेले होते. तेव्हापासून ते शिंदेसेनेकडे जाणार असल्याची चर्चा वाढली आहे. मात्र, मी राष्ट्रवादीकडूनच लढणार असल्याचा दावा बनसोडे यांनी केला आहे.

Previous Post
मोहालीत विश्वचषक सामना आयोजित न करण्यावरून काँग्रेस-आप सुरु झाले आरोप प्रत्यारोप 

मोहालीत विश्वचषक सामना आयोजित न करण्यावरून काँग्रेस-आप सुरु झाले आरोप प्रत्यारोप 

Next Post
समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्या मुस्लीम नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्या मुस्लीम नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

Related Posts
गोपी बहू बनली आई, देवोलिना भट्टाचार्जीला पुत्ररत्न प्राप्ती

गोपी बहू बनली आई, देवोलिना भट्टाचार्जीला पुत्ररत्न प्राप्ती

देवोलिना भट्टाचार्जी (Devolina Bhattacharjee) तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी पती शाहनवाजसोबतचे फोटो शेअर केले…
Read More
chagan bhujbal

‘नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; एकही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये’

नाशिक  :- नांदूरमध्यमेश्वर, देवगाव, कानळद, रुई, वाकद, कोळगाव,खेडलेझुंगे सह इतर अनेक गावांमध्ये गोदावरी डावा कालवा, गोदावरी उजवा कालवा…
Read More
यूपीआय

आता यूपीआय व्यवहार करणे झाले सोपे; कधीही नाही होणार फेल

मुंबई : पेटीएमने (Paytm) नुकतीच यूपीआय लाईट (UPI Lite) सेवा लॉन्च केली जी वापरकर्त्यांना एकाच क्लिकमध्ये पेमेंट्स करण्याची…
Read More