संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा भाजपने धसका घेतला आहे – भास्कर जाधव

मुंबई – शिवसेनेच्या (shivsena) नेतेपदी निवड होताच भास्कर जाधव यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. ज्याच्या खांद्यावर मान ठेवली त्यांनी केसाने गळा कापला. शिवसेनेने आधीच मित्रपक्ष वाढवले असते तर आज भाजपने केलेल्या विश्वासघाताच दुःख वाटलं नसतं, असं आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी म्हटलं आहे.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) युतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत टीका केली होती. त्यालाही जाधव यांनी प्रयत्युत्तर दिलं. आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या फडणवीसांच्या पक्षाने आजवर अनेकांशी युती केली आणि दगा दिला. मात्र, शिवसेना एकासोबत कायम राहिली. त्यांच्या सारखा आम्ही मित्र पक्षांना दगा दिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

शिवसेना अंगार आहे आगीशी कोणी खेळणार असेल तर खेळणाऱ्याची राजकीय कारकीर्द जळून खाक होईल. संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा भाजपने धसका घेतला आहे. 25 ते 30 वर्ष शिवसेनेने एकाच पक्षाच्या खाद्यावर विश्वासाने ठेवली होती. मात्र केसाने गळा कापण्याचे काम मित्र पक्षाने केलं, अशी टीका त्यांनी भाजपचं नाव न घेता केली. शिवसेनेशी युती असताना मात्र या पक्षाने अनेक पक्षाची युती केली आणि मित्र पक्षांना संपवले, असंही ते म्हणाले.