‘उद्धवजी … तिहेरी तलाक, राम मंदिर, यूसीसी आणि मुस्लिम आरक्षणावर तुमचे धोरण जनतेसमोर स्पष्ट करा’

नांदेड – केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, काल भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड इथं सभेचं आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या सभेचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडीला लक्षं करत उद्धव ठाकरेंसह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीका केली.

संविधानानुसार नसलेलं मुस्लीम आरक्षण, ट्रिपल तलाक, कलम 370 हटवणं, राम मंदिर, समान नागरी कायद्याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं शहा यांनी सांगितलं. या भाषणातून शाह यांनी उद्धव ठाकरे यांना चार प्रश्नही विचारले. उद्धवजी, सत्तेच्या लालसेपोटी तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. दोन बोटीत पाय ठेवता येत नाही, असं सांगतानाच तिहेरी तलाक, राम मंदिर, यूसीसी आणि मुस्लिम आरक्षणावर (Triple Talaq, Ram Mandir, UCC and Muslim Reservation)  तुमचे धोरण जनतेसमोर स्पष्ट करा, तुमची गुपिते आपोआप उघड होतील, असं आव्हानच अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं.