हा हिंदुस्थान चोरांच्या ताब्यात आहे, या देशावर भगव्याचे राज्य स्थापन करा – संभाजी भिडे

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे हे नेहमी विविध वादग्रस्त वक्तव्ये केल्याने नेहमीच चर्चेत येतात. यातच आता त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मिरज येथे अनावर करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांनी देशाला तीन बाधा झाल्या असल्याचे सांगितले. या तिन्ही बाधा वरचा तोडगा कोणता? हेही भिडे (sambhaji bhide)यांनी यावेळी सांगितले. (Sambhaji Bhide Latest Marathi News)

संभाजी भिडे म्हणाले, व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते. समाजात खाण्या पिण्यातून अनेकांना विषबाधा होते. पण या भूत-विष बाधावर उपाय आहे. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा. या तिन्ही बाधावर तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची उपासना आपण केली पाहिजे.

भिडे पुढे म्हणाले की, सबंध जगाचा त्राता म्हणून हिंदुस्थानला ताकद मिळाली पाहिजे. ती मिळायची असेल, तर एकच उपाय आहे. सबंध हिंदुस्थानचा रक्तगट बदलायला हवा. 123 कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी-संभाजीच करायला हवा. तो करण्याचा उद्योग शिवछत्रपतींच्या जीवनाच्या उपासनेतून होऊ शकतो. राष्ट्रोद्धार, राष्ट्रउन्नती हिंदुंच्या रक्तात उत्पन्न करण्यासाठी माझा जन्म आहे असं भगवंताला रोज सकाळी आपण म्हटलं पाहिजे. मायभूमीच्या कपाळावरील हिंदुत्वाच्या स्वातंत्र्याचे कुंकू टिकवणारा आणि जगाचा संसार चालवणारा देश घडवायचा असेल तर हे फक्त छत्रपची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे विचारच करू शकतात,असे मतही संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.

हा हिंदुस्थान चोरांच्या ताब्यात आहे. त्यांना नेस्तनाभूत करा. या देशावर भगव्याचे राज्य स्थापन करा. छत्रपती यांची जी अपेक्षा आहे. ते पूर्ण करण्याचे काम आपल्याला करावे लागेल. कोणतीही परकीय सत्ता असली तरी त्या चीनची पकड तोडून काढली पाहिजे. या देशाला ताकत देण्यासाठी हिंदुस्थानच्या सर्व समाजातील 123 कोटी जनतेचा रक्तगट बदलला पाहिजे. यांचा रक्तगट शिवाजी-संभाजी केला पाहिजे. यावेळी भिडेंनी उपस्थित लोकांना सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी राष्ट्रासाठी त्याग केला, राग मानू नका पण महाराजांच्या हृदयातील कण सुद्धा तुम्ही जाणत नाही. ते जाणले असते तर देशाचे चित्र आज वेगळे असते असेही भिडे म्हणाले.