22 जानेवारीला ‘या’ मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार; उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

Uddhav Thackeray – रामलल्लाच्या स्वागती जय्यत तयारी सुरू झाली आहे. राम मंदिराच्या (Ram Temple) सजावटीला सुरुवात झाली असून हजारो भक्तगण मंदिराला भेट देत आहेत. तसंच, मंदिर प्रशासनाकडूनही नियोजन आढावा घेतला जात आहे. २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रमुख पाहुणे असतील. सोबतच देशभरातील अनेक मान्यवर, साधुसंत उपस्थित असतील.

दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या उद्घाटन समारंभाला जाणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आज त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. बाबरी पाडल्यानंतर 25 ते 30 वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होत आहे. त्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला. आम्ही 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता. राम आमचासुद्धा आहे, असे त्यांनी सांगितले होते. असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहला धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग येऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो, असेही ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स