बनावट कागदपत्राच्या आधारे बालकांच्या अपहरणाचा प्रयत्न करणारे तीघे गजाआड

तुळजापूर – आंध्र प्रदेशातील अनोळखी इसमांनी दि . ०६.० ९ .२०२२ रोजी ११.०० वा . सु . सांजा चौक, उस्मानाबाद येथील बालगृहात असलेल्या बालकांना बनावट आधार ओळखपत्र व जन्म दाखल्यांच्या सहायाने ताब्यात घेऊन ( अपहरण करुन त्या बालकांचा अपव्यापार करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी उस्मानाबाद पोलिसांनी आंध्रप्रदेशातील कुरनुल येथील तिघांना ताब्यात घेतले आहे.यांना न्यायालयाने पाच दिवासाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, आंध्र प्रदेशातील अनोळखी इसमांनी दि . ०६.० ९ .२०२२ रोजी ११.०० वा . सु . सांजा चौक , उस्मानाबाद येथील बालगृहात असलेल्या बालकांना बनावट आधार ओळखपत्र व जन्म दाखल्यांच्या सहायाने ताब्यात घेऊन अपहरन करुन त्या बालकांचा अपव्यापार करण्याचा प्रयत्न केला होता.

यावरुन बालकल्याण समिती अध्यक्ष विजकुमार माने , रा . उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मा.दे.सं. कलम ४२० , ४६८ , ४७१,३७० , ५११.३४ अंतर्गत आनंदनगर पो . ठा . येथे गुन्हा क्र . २६२/२०२२ हा दि . ०६.० ९ .२०२२ रोजी नोंदवला आहे . सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल पवार , पोउपनि संदीप ओहोळ , पोलीस अंमलदार साईनाथ आशामोड , महिला पोलीस अमलदार वैशाली सोनवने , रंजना होळकर यांच्या पथकाने दि . ०६.० ९ .२०२२ रोजी सांजा रोड , उस्मानाबाद येथील बालकल्याण समीती अध्यक्ष विजयकुमार माने यांच्याशी संपर्क साधून सांजा रोड परिसरातून एस . लक्ष्मी कृष्णा , रा . कुरनूल , आंध्र प्रदेश हिस ताब्यात घेतले.

त्या महिलेकडे तपास केला असता ती पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नव्हती.तीच्या ताब्यात ०३ बनावट आधार कार्डसह चोरीचा एक मोबाईल व ४२,०००१ रोख रक्कम मिळून आली . तीच्या ताब्यातील मोबाईलवरून पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण करुन उस्मानाबाद शहरातील पोतदार इंटरनॅशनल स्कूल समोरील राष्ट्रीय महामार्गवरुन तीचे साथीदार दोन पुरुष यांस ताब्यात घेतले .

पोलीसांनी त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आपली नावे- एस . कृष्णा उर्फ गंगाधार सुभाराव , वय ४५ वर्षे व एस . साई व्यंकटेश , वय २८ वर्ष , दोघे रा . कुरनूल , आंध्र प्रदेश असे असल्याचे सांगीतले . त्यांकडे अधिक तपास केला असता त्यांच्या ताब्यात ०२ बनावट आधार कार्ड , चोरीचे ५ मोबाईल व बनावट वाहन परवान्यासह एक बोलेरो पिकअप मिळाल्याने पोलीसांनी ते हस्तगत करुन त्या तीघांस ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीस्तव आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले . आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या तीघांना ०५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि चैनसिंग गुसिंगे हे करत आहेत .