Amol Kolhe | शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेणार, अमोल कोल्हे यांची घोषणा

Amol Kolhe | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत आहे.

अजित पवारांनी आपल्या उमेवाराला निवडणूक आणण्यासाठी सर्वोतोपरी ताकद पणाला लावली आहे. त्यातच, उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर मतदारसंघात पाच वर्षे फिरकले नसल्याची वांरवार टीका केली जातेय. त्यामुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या कोल्हे यांनी वेळ पडल्यास आपण अभिनयातून ब्रेक घेऊ, असं म्हटले आहे.

“राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचं क्षेत्र आहे. माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. मी जे पाहिलेलं आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही”, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती