इतिहास रचला : भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच बाप-लेकीने जोडीने एकत्र विमान उडवले

बिदर : भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) इतिहासात (History) आणखी एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. भारतीय हवाई दलात पहिल्यांदाच वडील-मुलगी (Father-Daughter)जोडीने एकत्र विमान उडवले. एअर कमोडोर संजय शर्मा त्यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्यासोबत इन-फॉर्मेशनमध्ये उतरले. भारतीय वायुसेनेच्या प्रसिद्धीनुसार, एअर कमोडोर संजय शर्मा (Air Commodore Sanjay Sharma)आणि त्यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा (Flying Officer Ananya Sharma) यांनी कर्नाटकातील बिदर येथे हॉक-१३२ (Hawk 132)विमानातून उड्डाण केले.

30 मे रोजी उड्डाण झाले. असे करून या पिता-पुत्रीने भारतीय हवाई दलात इतिहास रचला आहे. भारतीय हवाई दलातील अधिकारी पिता-मुली जोडीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

एअर कमोडोर संजय शर्मा यांचा १९८९ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. त्यांना लढाऊ विमाने उडवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यांनी मिग-21 स्क्वॉड्रन (MiG-21 Squadron) तसेच फ्रंटलाइन फायटर स्टेशनचे नेतृत्व केले आहे. संजय शर्मा हे भारतीय हवाई दलातील उत्कृष्ट वैमानिक आणि युद्ध नियोजकांपैकी एक आहेत.

एअर कमोडोर संजय शर्मा यांची मुलगी फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा डिसेंबर 2021 मध्ये भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून रुजू झाली. पाच वर्षांनंतर, भारतीय हवाई दलाने आपल्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये महिला वैमानिकांना स्वीकारण्यास सुरुवात केली. फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. वडिलांप्रमाणेच अनन्या शर्मालाही सुरुवातीपासूनच भारतीय हवाई दलात भरती व्हायचे होते.