“…देवाजवळ आणखी काय मागावे”, शहाजीबापू पाटलांच्या पत्नीने घेतला ‘एकदम ओके मदी’ उखाणा

सांगोला :सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार (MLA)शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil)यांचा सध्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” हा डायलॉग प्रचंड व्हायरल होत आहे.  त्यांचा हा ऑडिओ कॉल व्हायरल(Viral Audio)झाल्यानंतर त्यांच्या डायलॉगची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असताना आता त्यांच्या पत्नीने घेतलेला एक उखाणा देखील चांगलाच चर्चेत आला आहे.

३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर शहाजीबापू पाटील अखेर १५ दिवसांनी आपल्या मतदारसंघात परत आले आहेत. यानंतर आता त्यांच्या पत्नी रेखाताई पाटील (Rekha Patil)यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी आपले पती शहाजीबापू पाटील यांच्यासाठी एक उखाणा घेतला आहे.

उखाणा घेताना त्यांनी म्हटलं की, “असेल तिथे मुलीनं नम्रतेनं वागावे, शहाजीबापूसारखे पती मिळाल्यावर देवाजवळ आणखी काय मागावे.” त्यांचा हा ‘ओके मदी’ घेतलेला उखाणा सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.